कला, विचार आणि मूल्यांचा सर्जनशील प्रवास
भारतीय परंपरा आणि आधुनिक डिझाईन शिक्षणाचा संगम
आचार्य द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट ही उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित एक सर्जनशील शिक्षणसंस्था आहे. येथे कला ही केवळ विषय नसून जीवन समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ड्रॉईंग, डिझाईन, रंगसंगती, कॉम्पोझिशन यांसोबतच विचारस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास यांवर विशेष भर दिला जातो. भारतीय कला, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा पाया घेत आधुनिक डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे शिक्षण येथे दिले जाते. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, या विश्वासावर आमची शिक्षणपद्धती आधारलेली आहे. त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन, अनुभवाधारित शिक्षण आणि कृतीशील अभ्यास यांवर भर देण्यात येतो. आचार्य म्हणजे कला, विचार आणि मूल्यांचा समतोल प्रवास होय.
Know Moreअनुभवाधारित शिक्षण, विचारस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास यांचा समतोल साधणे हेच आमचे शिक्षणतत्त्व आहे.